पात्रतेच्या अटी:
10
- लाभार्थी मुलगी १ एप्रिल २०२३ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेली असावी.
- कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावे.
- कुटुंब पिवळ्या (Yellow) किंवा केशरी (Orange) शिधापत्रिकाधारक असावे.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. १ लाखापेक्षा जास्त नसावे.
- ही योजना एका कुटुंबातील एक किंवा दोन मुलींना लागू असेल. एक मुलगा व एक मुलगी असल्यास, मुलीला लाभ मिळेल.
- दुसऱ्या अपत्याच्या लाभासाठी माता/पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र (Family Planning Certificate) सादर करणे अनिवार्य आहे.
अर्ज कसा करावा?
योजनेचा लाभ घेण्यासाठी, मुलीच्या पालकांनी संबंधित ग्रामीण किंवा नागरी क्षेत्रातील अंगणवाडी सेविका किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी (CDPO) कार्यालयाशी संपर्क साधावा. आवश्यक कागदपत्रांसह विहित नमुन्यातील अर्ज भरून अंगणवाडी सेविका किंवा मुख्यसेविका यांच्याकडे जमा करावा लागतो.